उठाव नसल्याने ढोबळी मिरचीचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:09 AM2018-05-06T00:09:05+5:302018-05-06T00:09:05+5:30

नाशिक : दरवेळी किमान ४० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होणाऱ्या ढोबळी मिरचीची आवक वाढूनही उठाव नसल्याने बाजारभाव जवळपास ७५ टक्क्यांनी घसरले.

Because there is no uprising, the prices of Chopi Chili have dropped | उठाव नसल्याने ढोबळी मिरचीचे भाव घसरले

उठाव नसल्याने ढोबळी मिरचीचे भाव घसरले

Next

नाशिक : दरवेळी किमान ४० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होणाऱ्या ढोबळी मिरचीची आवक वाढूनही उठाव नसल्याने बाजारभाव जवळपास ७५ टक्क्यांनी घसरले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या ढोबळी मिरचीच्या प्रतिजाळीला ७० ते ९० रुपये असा नीचांकी बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या ढोबळी मिरचीच्या १० किलो वजनी जाळीसाठी शेतकºयाला केवळ ७० रुपये मिळाले.
परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरची बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने मालाला उठाव कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ४० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव टिकून असलेल्या ढोबळी मिरचीचे भाव गेल्या ३ ते ४ दिवसांपासून घसरल्याने ढोबळी मिरची उत्पादक शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Because there is no uprising, the prices of Chopi Chili have dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार