शिक्षणातून चांगला माणूस घडावा : विभूजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:06 PM2018-04-03T14:06:09+5:302018-04-03T14:06:09+5:30
विभूजी महराज म्हणाले, सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिशन एज्युकेशन उपक्र मांतर्गत आपल्या सारख्या गरजू मित्रांसाठी शालेय साहित्य देऊ केले आहे.
नाशिक : संस्कारक्षम समाजाची निर्मिती आणि बलशाली सुंदर भारत घडविण्याची ताकद शिक्षकांकडे आहे. त्यांनी योग्यप्रकारे मानवी मुल्यांचे संस्कार देशाच्या भावी पिढीवर केलेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक संवेदनशील चांगला माणूस घडला तर आपला देश आणि समाजातून वाईट प्रवृत्ती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मानव उत्थान सेवा समितीच्या शिक्षण अभियानाचे प्रमुख श्रध्देय विभूजी महाराज यांनी व्यक्त केला.
निमित्त होते, वडाळागावातील मराठी माध्यमाच्या महापालिका शाळा क्रमांक ४९, १८ व उर्दू माध्यमाच्या १०,४३ आणि उर्दू हायस्कूल अशा सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे. सोमवारी (दि.२) येथील शाळेच्या आवारात समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कल्याणकारी शैक्षणिक उपक्रमाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, पुर्व प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे, नगरसेवक सुप्रीया खोडे, चंद्रकांत खोडे, अॅड. श्याम बडोदे व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक मराठी, उर्दू मनपा माध्यमाच्या शालेय विद्यार्थी व हायस्कूलचे काही विद्यार्थी मिळून दीड हजार विद्यार्थ्यांना चार वह्या, पेन, पेन्सील, खोडरबर, सामान्यज्ञान पुस्तकचा बंचसोबत बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने लेझीम नृत्य व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विभूजी महराज म्हणाले, सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिशन एज्युकेशन उपक्र मांतर्गत आपल्या सारख्या गरजू मित्रांसाठी शालेय साहित्य देऊ केले आहे. जेणेक रून शालेय साहित्याअभावी ते शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी सामाजिक भावना यामागे आहे. विभूजी महाराज व पाहूण्यांचे स्वागत केंद्रप्रमुख सबीया सय्यद यांनी केले. याप्रंसगी शाळांचे मुख्याध्यापक खुर्शीद खान, चंद्रभागा चौधरी, रशीदा शेख, वहीदा खान यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकले झाले आनंदी
वडाळागावातील शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरविणारे गरीब कुटुंबातील विदयार्थी आहे. शालेय साहित्य वेळेवर मिळेल आणि उत्साह कायम टिकून राहील असे क्वचितच घडते. त्यामुळे वह्या, पेन, पेन्सिलसारखे साहित्य हातात पडताच चिमुकले आनंदी झाले होते.
--