बनकर यांची उपआयुक्तपदी बदली वर्षभरात

By admin | Published: December 28, 2015 10:41 PM2015-12-28T22:41:07+5:302015-12-28T22:42:10+5:30

बदली झाल्याने आश्चर्य : सुनील गायकवाड नगरला

By becoming a Dy.C. replacing him in the year | बनकर यांची उपआयुक्तपदी बदली वर्षभरात

बनकर यांची उपआयुक्तपदी बदली वर्षभरात

Next

नाशिक : राज्यातील २१ जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, नाशिक जिल्हा परिषदेचे वर्षभरापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील गायकवाड यांची बदली झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (आस्थापना) या पदावर बदली झाली आहे.
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची विशेष बाब म्हणून जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. याचप्रकारे विशेष सूट देत नामदेव नन्नावरे यांची बीडला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. नन्नावरे हे बीडलाच मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. म्हस्कर यांची जळगावलाच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रमुखपदी बदली झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (विकास) नृसिंह मित्रगोत्री यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात त्याच पदावर बदली झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर जेजुरकर यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यांची औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्तपदी बदली झाली आहे. या पदावरील अशोक कोल्हे यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारपदी बदली झाली आहे. राज्यातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा या शासन आदेशात समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: By becoming a Dy.C. replacing him in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.