ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे सूक्ष्म नियोजन करून बेड वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:03+5:302021-04-05T04:13:03+5:30

नाशिक : दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करून ...

Bedding should be done with meticulous planning of oxygen, ventilator | ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे सूक्ष्म नियोजन करून बेड वाढवावे

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे सूक्ष्म नियोजन करून बेड वाढवावे

Next

नाशिक : दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करून जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण भागातील रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ. श्रीवास यांनी ऑक्सिजनची माहिती संकलनाबरोबरच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा वापर नियमाप्रमाणे होतो किंवा नाही, याची खात्री करावी. ऑक्सिजन वाया जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा उपचारादरम्यान ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्ह्यात दौरे करून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पुरेशा व्यवस्थेची तपासणी करण्याची सूचनादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरबरोबर खासगी रुग्णालयदेखील अधिग्रहीत करण्यात यावे. कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार होण्यासाठी एसएमबीटी, मविप्र रुग्णालये अधिग्रहीत करण्यात यावी, तसेच कोरोनाबाधित रुग्णांची व कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती वेळेवर पोर्टलवर भरण्याची सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या कक्षाला, तसेच नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रुग्ण वर्गीकरण विभागाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केली.

इन्फो

व्हेंटिलेटर वर्ग करावेत

ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरचा सुयोग्य वापर करण्यात यावा. जिथे आवश्यकता आहे तिथे व्हेंटिलेटर ठेवून उर्वरित व्हेंटिलेटर जे रुग्णालय वापरु शकते, अशा ठिकाणी वर्ग करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Bedding should be done with meticulous planning of oxygen, ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.