भारतीय बेरोजगार मोर्चाचे भीक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:03 AM2019-09-22T01:03:37+5:302019-09-22T01:03:59+5:30
भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यात ईव्हीएमच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक घेण्याचे स्पष्ट केल्यानंतर शनिवारी (दि.२१) निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताच भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले.
बेरोजगार मोर्चाचे डॉ. प्रशिक घनसावन, राजेंद्र गायकवाड, अमर दोंदे, अंजली आवारे, संदेश बाविसाने आदींसह जिल्हाभरातील विविध भागातून सुशिक्षित बेरोजगारांनी या आंदोलनात सहभाग घेत ‘ईव्हीएम सरकार, विद्यार्थ्यांना केले बेरोजगार’ अशी घोषणाबाजी करून ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रियेचा विरोध केला.