निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:05 PM2020-02-05T13:05:32+5:302020-02-05T13:16:32+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रीगंगा गोदावरी अवतरण दिनाच्या पाशर््वभूमीवर गोदावरी साक्षरता यात्रेचा शुभारंभ गोदावरीच्या जलाने जलकुंभ भरून प्रारंभ करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : श्रीगंगा गोदावरी अवतरण दिनाच्या पाशर््वभूमीवर गोदावरी साक्षरता यात्रेचा शुभारंभ गोदावरीच्या जलाने जलकुंभ भरून प्रारंभ करण्यात आला. ब्रह्मगिरी येथील गोदावरीच्या उगमस्थानावरुन हा जलकुंभ भरून आणण्यात आला. कुशावर्त तिर्थावर गोदावरीच्या जलाची महापुजा करु न ही यात्रा नगरपरिषदेत आणण्यात आली. तेथे या साक्षरता यात्रेचा उद्देश सांगुन मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. जलकुंभ समोर टेबलावर ठेवला होता. तब्बल सहा राज्यांमधून प्रवास केलेली गोदामाइ सहाही राज्यांना सुजलाम सुफलाम करून थेट राजमहेंद्रीला बंगालच्या उप सागरात विलीन झाली. गोदावरी अवतरण दिनाचे औचित्य साधुन गोदावरी साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. तत्पुर्वी सहा राज्यांमधुन आलेल्या प्रतिनिधीं समवेत कार्यक्रम होऊन जल कलश ब्रम्हाव्हॅली शैक्षणिक कॅम्पसमध्ये ठेवण्यात आला. यावेळीगौरव पानगव्हाणे पाटील, विविध शाखेचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर पाटील, प्राचार्य विनायक निखाडे , प्राचार्य चंद्रकांत शिरसाट आदींनी स्वागत केले. यावेळी गोदावरी साक्षरता यात्रेसमवेत डॉ. जाना राजेश पंडीत, नितीन हिंगमिरे, रोहीत जन्नावार, निशिकांत पगारे, योगेश बर्वे,आनंद कवळे तसेच तेलंगणा राज्यातील वॉटर रिसर्चचे चेअरमन प्रकाश राव आदी उपस्थित होते.
------------------------------------
सहा राज्यातून १५०० किमी प्रवास
तेलंगणा वॉटर रिसर्चचे चेअरमन प्रकाश राव म्हणाले. निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा गोदावरीचे उगमस्थान ब्रम्हगिरीपासुन ते थेट महाराष्ट्र तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, ओरिसा व बंगाल असे सहा राज्यांमधुन सुमारे १५०० किलोमीटर्सचा प्रवास करीत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीच्या समुद्रात गोदामातेच्या उगमस्थानाचे जल कलशाची विधीवत पुजा करु न विसिर्जत करण्यात येईल. दरम्यान ही यात्रा काढण्या मागचा उद्देश असा की पुर्वी प्रत्येक नदीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन पवित्र होता. पण हल्ली नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विपरीत होत आहे. पुर्वी नदीचा उपयोग होत असे तर आता नदीत सांडपाणी विसर्जन करणे, दुषित पाणी करणे, घाण टाकुन पवित्र नदीची गटारगंगा करणे. असे प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे त्यासाठी प्रचार प्रसार करणे हे काम मोठे असले तरी केवळ १५ दिवसांची निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा नसुन हे काम कायम स्वरु पी चालणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन आराखडा तयार करतील अशी माहिती नमामी फाउंडेशनचे राजेश पंडीत यांनी दिली.