बीएड प्रवेशप्रक्रियेस सुरुवात; आॅनलाइन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:59 PM2019-03-12T23:59:01+5:302019-03-13T00:27:17+5:30
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फ त २०१९-२० या शैक्षणिक वषार्साठी बी.एड. प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवरांनी ७ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान आॅनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फ त २०१९-२० या शैक्षणिक वषार्साठी बी.एड. प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवरांनी ७ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान आॅनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
सीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ८ जून रोजी मराठी, तर ९ जूनला इंग्रजी माध्यमासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. २० जून रोजीला परीक्षेचा निकाल जाहीर होऊन पुढील प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षात शिकणारे किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण, अनुतीर्ण उमेदवरांना सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी सर्वसाधारण संवर्गातील उमेदवारांना ८००, तर राखीव प्रवर्गातील उमेदरांना ४०० रुपये शुल्क असणार आहे. मविप्र शिक्षण संस्थेच्या नाशिक येथील बी.एड. महाविद्यालयात सीईटी परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी विनामूल्य आॅनलाइन अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांनी दिली.