बेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 07:50 PM2019-02-19T19:50:36+5:302019-02-19T19:51:15+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील बेलगाव तर्हाळे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ पासुन भव्य अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. नामदेव महाराज बैरागी यांच्या प्रेरणेने हा सप्ताह होणार आहे.
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील बेलगाव तर्हाळे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ पासुन भव्य अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. नामदेव महाराज बैरागी यांच्या प्रेरणेने हा सप्ताह होणार आहे.
दैनंदिन कार्यक्र मात पहाटे काकडा भजन, सकाळी आरती, संगित गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण. सांयकाळी प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. रविवारी (दि.२४) एकनाथ महाराज गोळेसर (भागवताचार्य, कुंदेवाडी) सिन्नर यांचे कीर्तन. सोमवारी (दि.२५) देवराम महाराज गायकवाड यांचे किर्तन, मंगळवारी (दि.२६) माधव महाराज घुले (मठाधिपती, ईगतपुरी) यांचे किर्तन, बुधवारी (दि.२७) वारकरी भुषण व्यंकटेश महाराज सोनवणे, गुरु वारी (दि.२८) ज्ञानेश्वर महाराज बोगीर (हिसवळ), शुक्र वारी (दि.१मार्च) रोजी स्वामी दिनानाथ महाराज ऋ षिकेश, शनिवारी (दि.२) किशोर महाराज खरात (काहाडळवाडी, वावी) व रविवारी (दि. ३) दिगंबर महाराज सोनवणे (बेलगाव तºहाळे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. दुपारी दिंडी सोहळा. (नगर प्रदक्षिणा) महिला पुरूष मंडळाचे जोहार भारूड, दहिहंडी, त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार असल्याचे या सोहळ्याचे नियोजन करणारे गायनाचार्य विठ्ठल महाराज वारुंगसे यांनी सांगितले.
अंबिका माता यात्रा उत्सवादरम्यान बेलगाव तºहाळे येथे कुस्त्यांची दंगल झाली तर उद्या बुधवारी (दि.२०) रोजी जंगी कुस्त्या होतील.