पोलीस भरतीसाठीच्या विनामूल्य शारीरिक प्रशिक्षण सत्रास सुरुवात
By admin | Published: May 18, 2014 11:30 PM2014-05-18T23:30:41+5:302014-05-19T00:30:23+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे पोलीस भरतीसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरातील शारीरिक सत्रास आजपासून मविप्रच्या मैदानावर प्रारंभ झाला़ या सत्राचे उद्घाटन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते झाले़ या शिबिराचा उमेदवारांना मोठा फ ायदा होणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले़

नाशिक शहर व ग्रामीण दलात होणार्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे विनामूल्य लेखी आणि शारीरिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे़ यातील शारीरिक सत्रास रविवारपासून प्रारंभ झाला़ के .टी़एच़एम़ महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत पोलीस भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून शारीरिक प्रशिक्षण सराव करून घेतला जाणार आहे, तर सीबीएस येथील जुन्या एऩडी़सी़सी़ बँकेत लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे़ हे सत्र सोमवारपासून दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे़
मविप्रचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक कैलास लवांड, क्रीडा मार्गदर्शक पद्माकर घुमरे, शरद पाटील, सारिका जगताप, सिद्धार्थ लाड, रमेश जुन्नरे, गणेश कोंडे, गणेश विसे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या शारीरिक प्रशिक्षण सत्रात उमेदवारांकडून गोळाफे क, लांब उडी, पाच कि़मी़ धावणे, पुलअप्स व विविध शारीरिक कवायतींचा सराव करून घेतला जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी युनिव्हर्सल फ ाउंडेशनचे संचालक राम खैरनार व डॉ़ जी़ आऱ पाटील स्पर्धा परीक्षेतील विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन करणार आहेत़
या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मनविसे शहराध्यक्ष मुकेश शहाणे, सुभाष कडलग, देवीदास वाटाणे, मयूर इघे, धनंजय कर्के, प्रदीप बोराडे आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या विनामूल्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आमदार वसंत गिते, अतुल चांडक, मनसे करिअर विभाग अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे़