बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:37 AM2018-03-06T01:37:27+5:302018-03-06T01:37:27+5:30
महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे.
नाशिक : महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात सोमवारी मुंबईत शिक्षण अधिकाºयांशी चर्चा होऊन अकरा मागण्या मान्य करण्यात आल्याने महासंघाने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. उर्वरित आठ मागण्यांवर अद्यापही तोडगा न निघाल्याने महासंघाने आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. यासंदर्भात येत्या १० किंवा १२ तारखेला अर्थमंत्र्यांशी बैठक होणार असून, त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. संजय शिंदे यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून शिक्षक संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली होती. या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत कनिष्ठ शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. यावेळी सर्व मागण्यांवर चर्चा होऊन अकरा मागण्या मान्य करण्यात आल्या.