जिल्हाभरात पोषण अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:26 AM2018-09-02T00:26:44+5:302018-09-02T00:27:07+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारपासून (दि.१) पोषण अभियानास सुरुवात झाली असून, पोषण अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानात १ ते ३० सप्टेंबर या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत विविध विभागांच्या सहभागातून अशाप्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून, शनिवारी सर्व तालुक्यांमध्ये या अभियानानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. तालुकास्तरीय कार्यशाळा, अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची फेरी, पोषण आहाराबाबत प्रदर्शन आदी उपक्रम राबवून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
या अभियानात पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, अनेमिया आजार, वैयक्तित स्वच्छता आदी विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून, गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी आदी विविध विषयांचे महत्त्व या अभियानाच्या माध्यामातून पटवून देण्यात येणार आहे.दि. १ सप्टेंबरपासून संपूर्ण महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्णातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून, मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी, माता व बालकाचे पोषण होऊन कुपोषण दूर होण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.