पेपरफुटीच्या चौकशीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:54 AM2018-04-30T00:54:47+5:302018-04-30T00:54:47+5:30

नाशिकरोड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखा पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा (एसवायबीएससी) लिनिअर अल्जेब्राचा (गणित) पेपरफुटी प्रकणाची विद्यापीठाच्या समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. बिटको महाविद्यालयात शनिवारी गणिताचा पेपर सोशल मीडियावरून फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या समितीने रविवारी (दि.२९) बिटको महाविद्यालयासह अन्य संबंधित ठिकाणांना प्रत्येक्ष भेट देऊन या प्रकरणाशी संबंधित विविध घटकांची कसून चौकशी केली.

The beginning of the paperfood investigation | पेपरफुटीच्या चौकशीला सुरुवात

पेपरफुटीच्या चौकशीला सुरुवात

Next
ठळक मुद्देसमितीची कार्यवाही : आप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

नाशिकरोड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखा पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा (एसवायबीएससी) लिनिअर अल्जेब्राचा (गणित) पेपरफुटी प्रकणाची विद्यापीठाच्या समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. बिटको महाविद्यालयात शनिवारी गणिताचा पेपर सोशल मीडियावरून फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या समितीने रविवारी (दि.२९) बिटको महाविद्यालयासह अन्य संबंधित ठिकाणांना प्रत्येक्ष भेट देऊन या प्रकरणाशी संबंधित विविध घटकांची कसून चौकशी केली.
पुणे विद्यापीठाने पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीतील विद्यापीठाच्या परीक्षा समितीचे समन्वयक प्रा. राजेंद्र तलवारे, प्रा. अरु ण पाटील यांनी नाशिकरोड येथे आम आदमी पक्षाचे
जिल्हाध्यक्ष जितेंद्र भावे, कार्यकर्ते सचिन गोंदके, विनायक येवले, विकास पाटील यांचाशी चर्चा करून पेपरफुटीची चौकशी केली. यावेळी भावे यांनी समितीला फुटलेला पेपर आणि विद्यापीठाचा पेपर दाखवतानाच अन्य पुरावेही सादर केले. त्यानंतर समितीने गणिताचा पेपर महाविद्यालयातून फुटला नसल्याचे सांगत या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून आम्ही मुख्य सूत्रधारापर्यंत लवकरच पोहचून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, पेपरफुटीची माहिती देणाºया व्यक्तींनी या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर तत्काळ विद्यापीठाला कळवले असते तर विद्यापीठाने प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, असा दावाही यावेळी समितीने यावेळी केला.
पुणे विद्यापीठातर्फे विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा लिनिअर अल्जेब्रा विषयाचा ४० गुण व दोन तास वेळेता पेपर २८ एप्रिलला रात्री सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. हे प्रकरण आम आदमी पक्षाच्या पदाधिकाºयांनी शनिवारी बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा पेपर दीड हजार रु पयांना विकला जात होता, असा दावा पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आणणाºया पदाधिकाºयांनी आहे.

Web Title: The beginning of the paperfood investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.