हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्ष भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:33 PM2019-02-04T16:33:32+5:302019-02-04T16:38:03+5:30

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.

At the beginning of the season the grapevine collapsed | हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्ष भाव गडगडले

हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्ष भाव गडगडले

Next
ठळक मुद्देसायखेडा : निर्यातक्षम द्राक्ष अवघे ५५ रुपये ; शेतकरी हवालदिल

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.
निर्यातक्षम द्राक्ष अवघे 55ते 60 रु तर लोकल 30ते 35 रु किलो दराने विक्र ी होत असल्याने कांद्यासारखाच द्राक्षाने वांदा केला आहे.
काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, अनुकूल वातावरण, भांडवलदार शेतकरी, व्यापारीकरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेल्या सुखसोयी, रस्त्यांचे जाळे, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे जंक्शन, विमानसेवा यामुळे नाशिकची द्राक्षे देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात विक्र ीसाठी प्रसिद्ध आहेत. युरोपीय देशातही सर्वाधिक मागणी होत असते शिवाय पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन या देशात निर्यात होतात उत्तर भारतात अनेक राज्यात नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी अर्थकारण कांदा आणि द्राक्ष पिकावर अवलंबुन आहे.
जिल्ह्यातील निफाड, नाशिक, दिंडोरी, चांदवड, सटाणा, काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जाते, द्राक्ष लागवडीचा खर्च हा किमान एकरी चार ते पाच लाख रु पये असल्याने प्रथम मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.
नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवे औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रुपये भाव मिळाला तर शेतकºयांच्या पदरात काहीतरी पडते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा टिकवून ठेवल्या आहेत, त्यामुळे खर्च वाढला आहे.
हंगामाच्या सुरवातीलाच ३० ते ३५ रु लोकल आणि ५५ ते ६० रुपये निर्यातक्षम द्राक्ष विक्र ी होत असल्याने खर्च वसूल होत नाही. शिवाय वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक असल्याने पुढील वर्षी फळ येण्यासाठी वर्षभर खर्च करावा लागतो अशा अनेक समस्या असल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकºयांना कांद्यासारखाच रडविणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
चौकट....
शेतकºयांचे वर्षाचे आर्थिक गणित द्राक्ष पिकावर अवलंबुन असते, आज हंगाम सुरू होऊन महिना झाला नाही तरी लगेच भाव गडगडले आहे. खरा हंगाम मार्च महिन्यात असतो, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. असेच दर राहिल्यास शेतकरी आर्थिक दृष्टीने पुरता भुईसपाट होईल, त्यासाठी भाव वाढीसाठी निर्यातक्षम द्राक्षांना सरकारने विशेष कर सवलत दिली पाहिजे.
शहाजी राजोळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी.
चौकट....
नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान चांगला भाव मिळाला तर शषतकºयांच्या पदरी चार पैसे शिल्लक रहातील.
भाऊसाहेब कमानकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी.
चौकट....
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेऊ लागला आहे. निर्यातक्षम द्राक्षे अधिक प्रमाणात झाली तर स्थानिक द्राक्षांना भाव मिळतो, मात्र सरकारचे निर्बन्ध व विविध प्रकारची कर आकारणी यामुळे अनेक व्यापाºयांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे बाजार भावात घसरण झाली आहे. याकरीता शेतकºयांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.
योगेश रायते, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ.

Web Title: At the beginning of the season the grapevine collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी