सोमज येथे एक गाव एक बँक उपक्रमाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 04:32 PM2021-02-02T16:32:46+5:302021-02-02T16:33:12+5:30

नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत एक गाव एक गणपती, एक गाव एक शिवजयंती सारखे उत्सव साजरे करण्यात आले, परंतू इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र कुंदे यांनी घोटी येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक विवेक कात्या यांची भेट घेऊन सोमज गावातील नागरिकांचे आर्थिक प्रश्न गावातच सोडवले जावे यासाठी थेट ह्य एक गाव एक बँकह्ण हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम राबवत इतर तालुक्यातील इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.

The beginning of a village one bank venture at Somaj | सोमज येथे एक गाव एक बँक उपक्रमाची सुरुवात

सोमज येथे एक गाव एक बँक उपक्रमाची सुरुवात

Next
ठळक मुद्देनादूरवैद्य ग्रामस्थांकडून स्वागत : जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत एक गाव एक गणपती, एक गाव एक शिवजयंती सारखे उत्सव साजरे करण्यात आले, परंतू इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र कुंदे यांनी घोटी येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक विवेक कात्या यांची भेट घेऊन सोमज गावातील नागरिकांचे आर्थिक प्रश्न गावातच सोडवले जावे यासाठी थेट ह्य एक गाव एक बँकह्ण हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम राबवत इतर तालुक्यातील इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील सोमज येथे संकल्प ग्रामविकास समिती तसेच ग्रामपंचायत सोमज यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्य एक गाव एक बँकह्ण हा उपक्रम इगतपुरी तालुक्यात व नाशिक जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आला. याबाबत सरपंच कुंदे यांनी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेत युनियन बँकेची निवड करून युनियन बँकेचे घोटी शाखेचे व्यवस्थापक विवेक कात्या व त्यांचे सर्व सहकारी गावात उपस्थित झाले असता आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना बँकेतील सर्व योजनांचे मार्गदर्शन केले. या सर्व योजना गावात राबविणार आहे.
त्यामध्ये गावात दोन दिवस बँकेचे कर्मचारी येऊन पैसे काढणे, पैसे जमा करणे, गावातील प्रत्येक व्यक्तीचा आरोग्य विमा, जीवन विमा काढणे, तसेच किसान कार्ड काढणे, कागदपत्रे पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज काढून देणे अशा सुविधा युनियन बँक सोमज गावात उपलब्ध करून देणार असल्याचे घोटी युनियन बँकेचे व्व्यवस्थापक कात्या यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मच्छिंद्र कुंदे, उपसरपंच गोरखनाथ भाकरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, संकल्प ग्रामविकास समितीचे सदस्य, स्वदेस फाऊंडेशनचे तुळशीराम खंडागळे, ग्रामसेवक योगिता वसावे तसेच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सोमज गावातील ग्रामस्थांना आर्थिक व्यवहारासाठी नेहमीच घोटीसारख्या दूर ठिकाणी जावे लागत असल्यामुळे तसेच बँकेत गर्दीचा सामना, आर्थिक समस्या व वेळ वाया जात असल्याने ग्रामस्थांच्या आग्रहाखातर युनियन बँकेचे सहकार्याने गावातच एक गाव एक बँक हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम राबवल्यामुळे ग्रामस्थांच्या आर्थिक गरजा गावातच पुर्ण होणार होवून ग्रामस्थांना दिलासा मिळेल.

- मच्छिंद्र कुंदे, लोकनियुक्त सरपंच, सोमज.
(०२ नांदूरवैद्य)

इगतपुरी तालुक्यातील सोमज येथे जिल्ह्यातील पहिलाच एक गाव एक बँक उपक्रमाचा शुभारंभ करतांना युनियन बँकेचे व्यवस्थापक विवेक कात्या समवेत मच्छिंद्र कुंदे, गोरखनाथ भाकरे, तुळशीराम खंडागळे व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ.

Web Title: The beginning of a village one bank venture at Somaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.