विंध्यवासिनी यात्रोत्सवाला सुरुवात
By Admin | Published: October 1, 2016 11:13 PM2016-10-01T23:13:36+5:302016-10-01T23:27:38+5:30
दिंडोरीत घरोघरी घटस्थापना
दिंडोरी : नवरात्र उत्सवाने ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी उत्सवाच्या वातावरणात महिलावर्गानी घट बसविण्यासाठी बाजारपेठेत दोन दिवसांपासून मोठी गर्दी केली होती. शनिवारी मोठ्या उत्साहात घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. विविध देवी मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी देवीची प्रतिस्थापना केली आहे. दिंडोरी परिसरात बाजार पटांगण पालखेड रस्त्यावरील चौफुली आदि ठिकाणी विक्रेते काळ्या मातीचे घट, लहान आकाराच्या टोपल्या, मातीचे दिवे, हळद कुंकू, शेंदूर, पूजेसाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती, ओटी खण, नारळ या वस्तूंबरोबरच देवीच्या आकर्षक मूर्ती व प्रतिमा खरेदीसाठी महिलांनी पसंती दर्शविली. नागरिकांची वर्दळ बाजारपेठेत दिसून येत असल्याने बाजारपेठेला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवामुळे तरुण-तरुणी यांची दांडियासाठी साहित्य घेतानाचे चित्र दिसून येत होते. अनेक मंडळांची दांडिया उत्सवानिमित्त तयारी चालू आहे.
दांडिया रसिकांमध्ये दांडगा उत्साह दिसून येत आहे. शहरात दांडियारासचे आयोजन करण्यात येते. विंध्यवासिनी मातेच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे, तर शुक्र वारपासून वणी सप्तशृंग गडावरून राज्याच्या विविध ठिकाणी ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांनी वणी- कळवण रोड भक्तिमय झाला होता; मात्र रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)