मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने वधु वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 03:37 PM2019-05-21T15:37:31+5:302019-05-21T15:38:12+5:30
वरखेडा :मातंग समाजातही इतर समाजांप्रमाणे वधु वर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मु.श.औरंगाबाद सभागृह नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मातंग समाज वधु वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.

प्रारंभी कवी सुभाष पवार लिखित अण्णाभाऊंच्या लेखणीची अशी गर्जते ललकार या गीताचे त्यांच्याच आवाजात सादरीकरण झाले.उदयोन्मुख गायक कु.प्रतीक सोळसे याने अण्णाभाऊंची लावणी गायली.प्रस्ताविकातून जिल्हाध्यक्ष अनिल निरभवणे यांनी संघटनेचे उल्लेखनीय कामकाज स्पष्ट केले.
ह्याप्रसंगी प्रा.अनिल शिरसाठ,जि. प सदस्य बाळासाहेब शिरसाठ उद्योजक राजू वैरागर,एल आय सी शाखाधिकारी बाळासाहेब वामन शिरसाठ, विक्र ीकर अधिकारी प्रशांत साळवे,बाफना वेअर हाऊस मॅनेजर नवल शिरसाठ,अशोकराव आहिरे यांचा यावेळी अध्यक्ष रमेश बागवे व कार्यकारिणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.