सरस्वती मंडळाच्या वतीने शाहिरी पोवाडा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:18 PM2019-09-17T23:18:02+5:302019-09-18T00:24:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून केलेली सुरुवात, जिजाऊंची शिकवण, अफजलखान भेट, पन्हाळ्याहून सुटका, संभाजी महाराजांचा संघर्ष अशा विविध प्रसंगांचा इतिहास पोवाड्यातून शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर केला. शेतकरी आत्महत्या, समाजातील कुप्रथांवर प्रबोधन करीत शाहिरी ढंगाने चुकीच्या परंपरांवर त्यांनी आसूड ओढले.

On the behalf of Saraswati Mandal, Shahiri Pawada was painted | सरस्वती मंडळाच्या वतीने शाहिरी पोवाडा रंगला

सिन्नर येथे सरस्वती कला-क्रीडा मंडळाने आयोजित केलेला शाहिरी पोवाडा कार्यक्र मात पोवाडा सादर करताना शाहीर स्वप्निल डुंबरे

Next

सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून केलेली सुरुवात, जिजाऊंची शिकवण, अफजलखान भेट, पन्हाळ्याहून सुटका, संभाजी महाराजांचा संघर्ष अशा विविध प्रसंगांचा इतिहास पोवाड्यातून शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर केला. शेतकरी आत्महत्या, समाजातील कुप्रथांवर प्रबोधन करीत शाहिरी ढंगाने चुकीच्या परंपरांवर त्यांनी आसूड ओढले.
सरस्वती कला-क्रीडा मंडळाने आयोजित केलेला शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्र म उत्साहात सादर झाला. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शाहीर डुंबरे यांच्यासह कलावंतांचा गौरव करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, प्रा. राजाराम मुगंसे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक शैलेश नाईक, महाराष्ट्र माझा परिवारचे संस्थापक बंटी भागवत, शिंगवेचे सरपंच धोंडीराम रायते, प्रभाकर फटांगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. मुंगसे यांच्या पत्नी लता मुंगसे यांना पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची शपथ यापासून शाहिरी पोवाड्यास सुरु वात करण्यात आली. अंगाला शहारे आणणारे सादरीकरण झाल्याने प्रेक्षक अडीच तास जागेवर खिळून होते. यावेळी संजीवनीनगर, देशमुखनगर, सरस्वतीनगर, ढोकेनगर, गोजरे मळा, साईबाबा नगर, शिवाजीनगर, वृंदावनगर परिसरातून श्रोते उपस्थित होते. प्रा. जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कर्पे यांनी आभार मानले.

Web Title: On the behalf of Saraswati Mandal, Shahiri Pawada was painted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.