आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:31 PM2018-03-29T13:31:02+5:302018-03-29T13:31:02+5:30
दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिली.
दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिली
तालुक्यातील रखडलेल्या जोरण येथील प्रकल्पास आवश्यक निधीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असली तरी अद्याप रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरण ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसत दिंडोरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरु वात केली. या आंदोलनाला अनेकांनी पाठींबा दर्शविला होता. त्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे,सुनील जाधव आदींनी भेट घेत यास पाठींबा दर्शवत प्रकल्पास निधी मिकवून देण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत स्वत: चर्चा करून निधी मिळवून देण्याचे आश्वासन भाऊसाहेब चौधरी यांनी दिले. प्रहारचे तालुकाध्यक्ष सुखदेव खुर्दळ यांनीही आंदोलकांची भेट घेत पाठींबा दिला.सायंकाळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बंडू शिंदे, अरु ण वाळके, सुनील जाधव यांनी मध्यस्ती केली. पाटबंधारे विभागाचे अभियंता मानकर यांनी आंदोलकांशी चर्चा करत पाच एप्रिलपासून काम सुरू होईल असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत प्रशासनाने शब्द पाळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी गणपत बाबा कड, बाळासाहेब गायकवाड संतोश वाघ, अरूण कड, सुनिल गायकवाड, दत्तु गायकवाड,, गोकूळ गायकवाड आदि आंदोलक उपस्थित होते.