छुपी पाणी कपात मागे

By admin | Published: February 10, 2016 11:17 PM2016-02-10T23:17:17+5:302016-02-10T23:26:23+5:30

प्रशासनाची शरणागती : आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

Behind the hidden water cut | छुपी पाणी कपात मागे

छुपी पाणी कपात मागे

Next

नाशिक : छुप्या पद्धतीने पाणीकपात ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयोग अंगलट आल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी छुपी पाणीकपात मागे घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्ण क्षमतेने जलकुंभ भरू शकले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला परंतु गुरुवारपासून ठरल्याप्रमाणे सुमारे १५ ते २० टक्के पाणीकपात धरून नाशिककरांना पाणीपुरवठा सुरळीत होण्याची ग्वाही मनपा प्रशासनाने दिली आहे.
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी शोधमोहीम राबवत प्रशासनाचा छुप्यारितीने सुरू असलेला ‘प्रयोग’ उघड केला. दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीकपात सुरू आहे. त्यानुसार महापालिकेकडून गंगापूर आणि दारणा धरणातून सुमारे ३५० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाण्याची उचल केली जात होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर पाण्याची उचल सुमारे ३१० ते ३२५ दशलक्ष लिटर्स केली जात आहे. महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश देऊनही प्रशासनाकडून राज्य शासनाच्या दबाबापोटी त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती, परंतु प्रशासनाने महापौरांसह पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत छुपी पाणीकपात सुरू केल्याचे उघडकीस येताच पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांनी पत्रकारांसमक्षच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार आणि अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना धारेवर धरत छुपी पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेशित केले. त्यानुसार, वाढीव दहा टक्के छुप्यारीतीने सुरू असलेली पाणीकपात मागे घेत प्रशासनाने शरणागती पत्करली. मंगळवारी रात्री पाणीपुरवठा विभागाने जलकुंभामध्ये १५ ते २० टक्के पाणीकपात लक्षात घेऊनच पाणी भरले. रात्री दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात अडथळा आला. त्यामुळे बुधवारी सकाळी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकला नसला तरी गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Behind the hidden water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.