किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:05 AM2020-02-27T00:05:49+5:302020-02-27T00:06:33+5:30

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

 Behind the Kisan Sabha B-bone agitation | किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

googlenewsNext
ठळक मुद्दे रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही, असे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बिºहाड आंदोलन सुरू होते. त्यानंतर बुधवारी किसान सभेचे पदाधिकारी प्रांत डॉ. संदीप आहेर, वनविभागाचे अधिकारी, पोलीस विभाग यांच्याशी चर्चा झाली. त्यात समाधानकारक चर्चा झाली.
रेशन कार्डबाबत तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणींवर स्वत: प्रांताधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही, असे सांगण्यात आले.
संजय गांधी योजना कार्यालयामार्फत प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रांत डॉ. संदीप आहेर यांनी मान्य केले. किसान सभेचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन प्रतिनिधींनी सातत्याने तहसीलदारांशी संपर्क साधावा व मार्ग काढावा, रेशन कार्डचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन प्रांत डॉ. आहेर यांनी दिले. त्यानंतर मंगळवारी रात्री आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किसन गुजर, रमेश चौधरी, तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार तांबे आदी उपस्थित होते. दाव्याची पुनर्तपासणीभातोडे वनजमिनीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयामुळे अडलेला आहे. अपात्र लाभधारकांच्या वनहक्क दाव्याची पुनर्तपासणी पुन्हा करण्यात येईल, त्याबाबत न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील. चंडिकापूर, ओझरखेड, भातोडे आदी ठिकाणी वनविभागाने तोडगा मान्य केला.

Web Title:  Behind the Kisan Sabha B-bone agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.