बेलगाव कुºहे येथे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:12 PM2019-05-11T23:12:46+5:302019-05-11T23:14:37+5:30
नांदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला.
Next
ठळक मुद्दे आदर्श विद्यार्थी जीवन व्यतीत करण्यासाठीचे मार्गदर्शन
न ंदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला.इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम महाराज गुळवे हे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. वारकरी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांवर लहानपणापासूनच पारमार्थिक गोडी लागावी, बालमनावर सुसंस्कार घडावेत तसेच भावी पिढी संस्कारक्षम तयार होण्याच्या उद्देशाने पंचक्रोेशीतील दहा गावांमधील १५० मुलांना बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून वारकरी शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. शास्त्रीय संगीत राम महाराज घुगे व मच्छिंद्र महाराज विंचाळ शिकवितात तर अतुल महाराज तांबे हे पखवाज वादन मुलांकडून अवगत करून घेतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टीमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करण्यासाठी बालसंस्कार शिबिरात मुलांना शूरवीरांच्या गोष्टीदेखील सांगितल्या जातात. स्वत:ची कामे स्वत: करावी, आई वडिलांची सेवा करायची, आदर्श विद्यार्थी जीवन व्यतीत करण्यासाठीचे मार्गदर्शन अधिकारी व्यक्तीकडून केले जाते. मुले गावातून माधुकरी मागतात, तसेच प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळ गावातील अन्नदात्यांनी पंगतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार एकत्रितपणे भोजन केले जाते.