बेळगाव ढगा-सारूळ रस्त्याचे तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:30 IST2019-10-13T22:43:32+5:302019-10-14T00:30:12+5:30
बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट्ट्या नसल्याने अपघातात वाढ होत आहे.

बेळगाव ढगा-सारूळ रस्त्याचे तीन तेरा
विल्होळी : बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट्ट्या नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
बेळगाव ढगा ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदारास निवेदन देऊन काम करण्यास विनंती केली. परंतु ठेकेदार काम करण्यास तयार नाही बघून संबंधित ठेकेदारास विरु द्ध ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर सदर ठेकेदाराला यासंबंधी लेखी स्वरूपात विचारणा केली असता तीन महिन्यांपासून कामा सुरू करण्याचे केवळ आश्वासन मिळत आहे. अर्धवट झालेल्या कामांमध्ये तीन मीटरच्या मातीचा रस्ता करून त्यास साइटपट्टी न दिल्याने व त्यातच हा रस्ता वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते, समोरून दुसरे वाहन आल्यास त्यास एक किलोमीटर मागे जावे लागते. या कारणास्तव अनेक वेळा अपघातदेखील झाले आहेत, असे गावकऱ्यांनी सांगितले.