नीतिमान वकिलांवर विश्वास ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:57 AM2018-11-12T00:57:27+5:302018-11-12T00:59:09+5:30
सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.
नाशिक : सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.
संवाद संस्थेच्या वतीने घुमरे यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. क. का. घुगे हे उपस्थित होते. यावेळी घुमरे यांनी अॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. शंकर बोºहाडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत बालपणाच्या आठवणी, शिक्षणाच्या वाटचालीपासून देशात झालेले राजकीय-सामाजिक बदल, विविध राष्टÑीय नेत्यांचे विचार अशा चौफेर पद्धतीने आपले विचार मांडले.
यावेळी घुमरे म्हणाले, व्यापारीवृत्तीमुळे देशातील सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात नीतिमत्तेची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. व्यापारी दृष्टिकोनचा पगडा सर्वच क्षेत्रात वाढत असताना वकिली क्षेत्रही त्यापासून सुरक्षित राहू शकले नाही; मात्र या देशातील लोक वेडे नाहीत की ते दररोज न्यायालयाचा उंबरा ओलांडतात. त्यांना खात्री असते वकील आपल्याला न्याय मिळवून देईल. गरिबीमुळे बालपणात अन्यायाविरुद्ध चीड येत होती. गांधीजी देशाची उभारणी करत असताना त्यांच्याविषयी काढल्या जाणाऱ्या वाईट उद्गारामुळे चीड निर्माण होत होती. त्यावेळी तरुणांना सोबत घेत मोर्चा काढला असता उदोजी वसतिगृहातून बाहेरचा रस्ता दाखविला गेला.
सावरकर कोणालाही समजले नाही
सावरकर यांची विचारधारा, देशप्रेम, राष्टÑभक्ती भाजप, राष्टÑीय स्वयंसेवक संघासह कोणालाही समजलेली नाही, अशी खंतही घुमरे यांनी यावेळी बोलून दाखविली. सावरकरांच्या सभेला दोन तास उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या विचारांनी माझ्यावर पडलेल्या प्रभावातून मी आजही बाहेर येऊ शकलेलो नाही.