आली आली घंटागाडी... पण कळतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:25+5:302021-03-15T04:14:25+5:30
नाशिक शहरात कोरोना संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने उपाययोजनांबरोबरच जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार घंटागाडीवरील ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून ...
नाशिक शहरात कोरोना संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने उपाययोजनांबरोबरच जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार घंटागाडीवरील ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना दक्षता घेण्याबाबतची माहिती दिली जाते. कोरोना संकटाशी सामना कसा करावा याबाबतचा संदेश या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे घंटागाडी आल्याचेही महिलांना कळते.
परंतु गेल्या दहा दिवसांपासून गणेश नगर, जाखडी नगर, पाटील गार्डन आयटीआय कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरात फिरणाऱ्या घंटागाडीवरील जनजागृती करणारे ध्वनीक्षेपक बंद आहे. त्यामुळे घंटागाडी वरील चालक किंवा कामगार हातात पत्रा घेऊन काठीने वाजत घंटागाडी आल्याचे संकेत देतात. नागरिकांना हे कळत नसल्याने त्यांची धावपळ होते. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी होणारी जनजागृती होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे