बिरोबा मंदिरातून घंटा चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:57+5:302021-02-05T05:49:57+5:30
सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक वाढली सिन्नर : चौथा शनिवार, रविवार आणि मंगळवारी प्रजासत्ताक दिन या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डी महामार्गावर ...
सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक वाढली
सिन्नर : चौथा शनिवार, रविवार आणि मंगळवारी प्रजासत्ताक दिन या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डी महामार्गावर वाहतुकीची प्रचंड गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे. रविवारी तर घोटी चौफुलीवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते. सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून वाहतूक वाढल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. कोरोना कमी झाल्यानंतर भाविक व पर्यटक सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले.
सिन्नर येथे वाहतूक सुरक्षा कार्यक्रम
सिन्नर : येथील एस. टी. आगारात मासिक सुरक्षा मोहिमेंतर्गत कार्यक्रम पार पडला. एसटीचे विभागीय अधिकारी विजय झगडे, आगाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तडवी, ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे सिन्नर तालुकाप्रमुख डॉ. श्यामसुंदर झळके, कार्यशाळाप्रमुख सौरभ रत्नपारखी, वाहतूक नियंत्रक भास्कर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक राजकुमार तडवी यांनी आपण आपली सुरक्षितता सांभाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे असे, आवाहन केले. देवा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ रत्नपारखी यांनी आभार मानले.
बारागावपिंप्री येथे युवकाची आत्महत्या
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील २३ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. राहुल गौतम जगताप असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने घरात खोलीत छताला असलेल्या पंखा लटकवण्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. मयताचा भाऊ मयूर जगताप याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कारखान्यासमोरून दुचाकीची चोरी
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यासमोर लावलेली पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. येथील वृंदावनगरातील रोशन एखंडे यांनी त्यांची बजाज पल्सर दुचाकी (क्र. एमएच १५ एचजे ०९७६) निओ व्हिल्स लि. कंपनीसमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याची फिर्याद एखंडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.