महसुल कर्मचाऱ्यांचा येवल्यात घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 07:26 PM2019-07-24T19:26:34+5:302019-07-24T19:28:20+5:30

येवला : महसुल कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला तहसिल कार्यालयातील कर्मचाºयांनी येवला तहसिल कार्यालयासमोर दुपारी जेवणाच्या सुटीत घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात सर्वच कर्मचाºयांनी सहभाग घेतला.

Bells ringing | महसुल कर्मचाऱ्यांचा येवल्यात घंटानाद आंदोलन

घंटानाद आंदोलनात सहभागी झालेले महसूल विभागाचे कर्मचारी.

Next
ठळक मुद्देयेवला तहसिल कार्यालयासमोर दुपारी जेवणाच्या सुटीत घंटानाद आंदोलन केले.

येवला : महसुल कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला तहसिल कार्यालयातील कर्मचाºयांनी येवला तहसिल कार्यालयासमोर दुपारी जेवणाच्या सुटीत घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात सर्वच कर्मचाºयांनी सहभाग घेतला.
महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करावे, नायब तहसिलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरु न ४६०० मान्य करावा, अव्वल कारकून वर्ग ३ या संवर्गाच्या वेतनश्रेणीमधील त्रुटी दूर करावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. आकृती बंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर मंजूर करणे. महसूल विभागातील सर्व लिपिक शिपायांचे रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावे, गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाºयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा राबविण्यात यावी. नायब तहसिलदाराकडे सरळ सेवा भरतीचे पदे प्रमाण ३३ टक्क्यांवरु न २० टक्के करणे. संजय गांधी, गौण खनिज, रोहयो आदी महसुलेतर कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करु न मंजुरी आदेश निर्गमीत करावे, व्यापगतपदे पुनर्जिवीत करण्याची कार्यवाही करावी, महसूल विभागातील वर्षानुवर्षे अस्थायीपदे स्थायी करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बाळासाहेब हावळे, उत्तम खांडवी, सुभाष गिते, पी. एन. तांबे, किनाके, सी. व्ही. चंदावार, ए. पी. धमके, आर. एन. कुंभार्डे, आनंद शंकपाळ, व्ही. आर. राऊत, व्ही. डी. खडके, आर. बी. शिरसाठ, बी. एम. सरवदे, वाय. एस. मिटकरी, महाजन, सुधीर पाटसकर, अनिल नाईक आदींसह सर्व कर्मचारी शिपाई सहभागी झाले होते.
 

Web Title: Bells ringing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार