दिव्यांग निधीपासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:04 PM2020-06-11T22:04:22+5:302020-06-12T00:29:42+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के राखीव असलेला निधी अद्याप वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित असल्याने त्यांनाहा निधी तत्काळ मिळावा.
सायखेडा : निफाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के राखीव असलेला निधी अद्याप वाटप करण्यात आलेला नाही.
त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित असल्याने त्यांनाहा निधी तत्काळ मिळावा,
अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे यांनी निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड उपस्थित नसल्याने त्यांना टपालाद्वारे निवेदन देण्यात आले
आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील वेगवेगळ्या योजनांमध्ये पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव असतो. दिव्यांग व्यक्तींना सदर निधी आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत लाभार्थींना वाटप करायचा असतो.
यावेळी निफाड तालुकाध्यक्ष अमोल ब्राह्मणे, उपतालुकाध्यक्ष
ऋषिकेश वाघ, निफाड तालुका संपर्कप्रमुख किशोर शिंदे, सरचिटणीस अरुण पगारे, तालुका सचिव गणेश आव्हाड, संघटक दीपक शिंदे, रोहित वैद्य आदी उपस्थित होते.
------------------
निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून साहित्य खरेदी करणे तसेच दिव्यांगांना सायकल वाटप करणे अशा विविध कारणांसाठी खर्च करावयाचा असतो. हा निधी अद्यापपर्यंत दिव्यांगांना वाटप केला नसल्याच्या तक्र ारी संघटनेकडे आल्या आहे.