घरकुलासाठी पैसे घेतल्याची लाभार्थ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:55 PM2019-07-25T18:55:56+5:302019-07-25T18:56:15+5:30

सुरगाणा : प्रशासनाकडून चौकशी समिती नियुक्त

 Beneficiary complaint of taking home money | घरकुलासाठी पैसे घेतल्याची लाभार्थ्याची तक्रार

घरकुलासाठी पैसे घेतल्याची लाभार्थ्याची तक्रार

Next
ठळक मुद्दे पैसे देऊनही पुढील बिल काढणेकामी पाच हजार रु पयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थी पवार यांनी केला आहे

सुरगाणा : एकीकडे कळवण तालुक्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत चांगले काम करु न राज्यात प्रथम क्र मांक पटकाविला असताना दुसरीकडे मात्र सुरगाणासारख्या अतिदुर्गम भागातील लाभार्थीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत प्रशासन यंत्रणेतीलच काही व्यक्तींकडून घरकुल योजनेची बिले काढणे करीता तसेच जिओ टॅग करणेकामी प्रत्येक लाभार्थी कडून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत लेखी तक्र ार नागशेवडी ग्रामपंचायत मधील वांझुळपाडा येथील लाभार्थी शिवाजी तुकाराम पवार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, प्रशासनाने याबाबत चौकशी समिती नियुक्ती केली आहे.
पवार यांनी तक्र ारीत म्हटले आहे की, मला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून जिओ टॅग करणेसाठी माझ्या कडून ग्रामपंचायतमधील शिपाई प्रकाश चव्हाण यांनी एक हजार रु पये रोख घेतले आहेत. त्यानंतर रोजगार सेवक जयराम जोपळे यांनी पाच हजार रु पये घेतले. इतके पैसे देऊनही पुढील बिल काढणेकामी पाच हजार रु पयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थी पवार यांनी केला आहे. असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांच्याकडून लुबाडणूक झाली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करु न लाभार्थींची होणारी लूट थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य धर्मा पवार, भारती बागुल, मधुकर जोपळे, सुरेश गाढवे आदींच्याही स्वाक्षऱ्या आहेत..


कोट...
पैसे घेतल्याबाबत लाभार्थीनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्र ार केली असून त्यांनी पाच जणांची चौकशी समिती नेमली आहे. येत्या दोन दिवसात चौकशी अंती वस्तुस्थिती समजेल. त्यानंतर सबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- व्ही.डी. बागुल, ग्रामविकास अधिकारी, नागशेवडी.

Web Title:  Beneficiary complaint of taking home money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.