येवला तालुक्यात ७५० लाभार्थ्यांना गाय-गोठ्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:24+5:302021-09-03T04:15:24+5:30

जळगाव नेऊर : पुरणगाव येथे श्रावण ठोंबरे व सोपान गाडे यांच्या गाय-गोठ्यांचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या ...

Benefit of cowshed to 750 beneficiaries in Yeola taluka | येवला तालुक्यात ७५० लाभार्थ्यांना गाय-गोठ्याचा लाभ

येवला तालुक्यात ७५० लाभार्थ्यांना गाय-गोठ्याचा लाभ

Next

जळगाव नेऊर : पुरणगाव येथे श्रावण ठोंबरे व सोपान गाडे यांच्या गाय-गोठ्यांचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.

तालुक्यात आजवर ७५० लाभार्थ्यांना गाय-गोठ्यांचा लाभ दिला असून कुठलीही माहिती, अडचण, शंका असल्यास थेट पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले. दरम्यान, नवीन कृती आराखडा बनविणे चालू असून जास्तीत जास्त लोकांनी नावनोंदणी करावी, असे ते म्हणाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश कांबळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, कल्पना ठोंबरे, रोजगार सेवक रहीम शेख, बापू ठोंबरे, शिवाजी खापरे, बापू थेटे, माधव ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(०१ जळगावनेऊर)

येवला तालुक्यात पुरणगाव येथे गाय-गोठ्याचे भूमिपूजन करताना प्रवीण गायकवाड, हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, श्रावण ठोंबरे, रामनाथ ठोंबरे.

020921\02nsk_43_02092021_13.jpg

येवला तालुक्‍यात पुरणगाव येथे गाय-गोठ्याचे भूमिपूजन करताना प्रवीण गायकवाड, हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, श्रावण ठोंबरे ,रामनाथ ठोंबरे.

Web Title: Benefit of cowshed to 750 beneficiaries in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.