३३ लाख रुग्णांना अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ
By विजय मोरे | Published: October 14, 2018 01:25 AM2018-10-14T01:25:24+5:302018-10-14T01:32:48+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत बीव्हीजी इंडियामार्फ त संपूर्ण महाराष्ट्रात २०१४ पासून १०८ अॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. गत चार वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत या सेवेने राज्यातील ३२़९७ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविली आहे. या सेवेंतर्गत बेसीक लाईफ सपोर्टच्या (बीएलएस) ७०४ तर अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस)च्या २३३ अशा दोन प्रकारच्या अॅम्ब्युलॅन्स सेवा पुरविण्यात येत असून, संपूर्ण राज्यात ९३७ अॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत.
या सेवा पूर्णत: निशुल्क असून १०८ या टोल फ्री क्रमांकाद्वारे या सेवेचा लाभ गरजूला घेता येतो. एवढेच नव्हे तर सदर सेवेने अलीकडेच मोबाइल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे सदर अॅपद्वारे एका क्लिकवर गरजूला मदत मिळू शकते. यासाठी रुग्णाचा पत्ता सांगण्याची गरजही पडत नाही. १०८ अॅम्बुलन्स सेवेबाबत नागरिक समाधानी असून गरजंूना वाहन व आरोग्य या दोन्ही सेवा एकाचवेळी सहज व मोफत उपलब्ध होत आहे.