देशव्यापी संपामुळे शेतकऱ्यांचा फायदाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:54 AM2018-05-17T00:54:34+5:302018-05-17T00:54:34+5:30
नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० विविध शेतकरी संघटनांना एकत्रित घेऊन १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. परंतु, या संपात शेतकºयांना नुकसान सोसावे लागणार असल्याचा गैरसमज काही मंडळी पसरवित असून, अशा प्रकारे करण्यात येणारा अपप्रचार चुकीचा असल्याची भूमिका राष्ट्रीय किसान महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे सदस्य शंकर दरेकर यांनी स्पष्ट केली असून, या संपामुळे शेतकºयांचा फायदाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० विविध शेतकरी संघटनांना एकत्रित घेऊन १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. परंतु, या संपात शेतकºयांना नुकसान सोसावे लागणार असल्याचा गैरसमज काही मंडळी पसरवित असून, अशा प्रकारे करण्यात येणारा अपप्रचार चुकीचा असल्याची भूमिका राष्ट्रीय किसान महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे सदस्य शंकर दरेकर यांनी स्पष्ट केली असून, या संपामुळे शेतकºयांचा फायदाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असल्याचे सांगत नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने संपात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दरेकर यांनी बुधवारी (दि. १६) ‘लोकमत’शी बोलताना राष्ट्रीय किसान महासंघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राष्ट्रीय किसान महासभेने पुकारलेल्या शेतकरी संपादरम्यान देशभर १२८ निवडक शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा बंद केला जाणार आहे. मुळात सध्याचे सरकार केवळ शहरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन विविध धोरणे राबवित आहे व याचा फटका शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे संपकाळात केवळ शहरांचा पुरवठा बंद करून उर्वरित भागात शेतकºयांना विक्री करता येणार आहे. या संपात अशा प्रकारे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांचा पुरवठा बंद करण्याचे किसान महासंघाने नियोजन केले असून, या शहरांमध्येही मोठ्या मैदानावर शेतकºयांना आपल्या मालाची किंमत स्वत:च ठरवून परवडणाºया दरात भाजीपाला व दुधाची विक्री करता येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. गतवर्षी शेतकरी संपादरम्यान काही व्यापाºयांनी संपाचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने भाजीपाला विकल्याचे निदर्शनास आल्याने यावर्षी शेतकºयांनी दर ठरवून मालाची थेट विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना अधिक फायदाच होणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघाचे नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अशी व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असून, या मैदानावर शेतकºयांना थेट दूध विक्रीही करता येणार आहे; मात्र दूध संघ व दूध डेअरी यांना येथे विक्री करता येणार नाही. नाशिकमध्ये दुधाचा दर महासंघाने ६० रुपये लिटर इतका ठेवला असून, यामुळे शेतकरी फायद्यातच येणार असल्याचे सांगताना शेतकरी हितासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या वर्षी राज्यव्यापी शेतकरी संप करताना कर्जमाफी, हमीभाव, दूध दर अशा मागण्या ठेवल्या होत्या; मात्र कर्जमाफी वगळता इतर निर्णय केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळे यावेळी देशव्यापी शेतकरी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी एकत्रितरीत्या ११ एप्रिल रोजी पुण्यातील बैठकीमध्ये घेतला आहे. या बैठकीत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कोअर कमिटीत काम करण्याचा निर्णय झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.