शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुधीरकुमार बुके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:23 AM2018-03-19T01:23:39+5:302018-03-19T01:23:39+5:30
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरण नाशिकचे सचिव न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले़
त्र्यंबकेश्वर : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरण नाशिकचे सचिव न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले़ त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समितीच्या कै. महाले कोंडाजी सकाळे सभागृहात तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, लोकसेवक यांच्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत देण्यासाठी करोडो रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते, तथापि गरिबांना, दिव्यांगांना व महिलावर्गाला लाभ मिळण्याऐवजी आलेला निधी लाभ न दिल्यामुळे परत पाठवावा लागतो, हे योग्य नाही. लाभार्थींना लाभ मिळालाच पाहिजे. यावेळी पंचायत समिती सभापती ज्योती जयवंत राऊत, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपसभापती रवींद्र भोये, सदस्य देवराम शिवा मौले, मोतीराम दिवे, अलका मधुकर झोले, मनाबाई शिवाजी भस्मा, सहायक गटविकास अधिकारी समीर वाठारकर, इमारत व दळणवळण विभागाचे उपअभियंता निळे, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी योगेश मोरे, शाखा अभियंता आहेरनाना आदींसह सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते. आभार उपसभापती रवींद्र भोये यांनी मानले, तर सभापती ज्योती राऊत यांच्या हस्ते न्या. सुधीरकुमार बुके यांचा सत्कार करण्यात आला.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसाठी मेळावा
साधारणत: मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व विभागांचे स्टॉल व सर्व अधिकारी उपस्थित राहतील. यासाठी तालुक्यातील महिलावर्ग, अपंग, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, गरीब अशा लोकांनी या मेळाव्यासाठी जरु र यावे, असे आवाहन न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले.