बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:46 AM2019-10-05T01:46:00+5:302019-10-05T01:46:34+5:30
बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे विभागीय आयुक्त विवेक जाधव, खासदार भारती पवार उपस्थित होते. यावेळी दुर्गापूजा महोत्सव-२०१९ या धार्मिक पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनतर्फे षष्टी ते दशमीच्या काळात दुर्गादेवीची रोज आरती, पूजा, पुष्पांजली, संध्या आरती असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोज संध्या आरतीनंतर याठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला असून, दुपारीही भोग म्हणून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण मुखर्जी, सचिव अमिताब चक्रवती, कमिटीचे अध्यक्ष गौतम नाग, एस. एच. बॅनर्जी, तरुण मुखर्जी, उपाध्यक्ष प्रसांता भट्टाचार, शेखर दत्ता, सुसलव बिस्वास, सचिव अनिमेश मुखर्जी, डॉली चौधरी आदी उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.