सुरक्षेचा सर्वोत्तम पर्याय मास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:14+5:302021-02-27T04:18:14+5:30

नाशिक : कोरोनापासून बचावासाठी लसीकरण सुरू असून १ मार्चपासून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र, ...

The best alternative to safety mask! | सुरक्षेचा सर्वोत्तम पर्याय मास्क !

सुरक्षेचा सर्वोत्तम पर्याय मास्क !

Next

नाशिक : कोरोनापासून बचावासाठी लसीकरण सुरू असून १ मार्चपासून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र, या प्रक्रियेसदेखील निश्चित कालावधी लागणार असून त्यानंतरच प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रत्येक नागरिकासाठी मास्क हाच सुरक्षेचा सर्वोत्तम पर्याय पहिल्या दिवसापासून असून यापुढेही राहणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गत आठवडाभरापासून मोठ्या वेगाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणे आणि संभावित धोक्यापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रत्येकाचे शस्त्र आहे, असे समजून तो लावूनच सर्वत्र वावरणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात लसीकरणातदेखील दोन लस पूर्ण झाल्यानंतरच डोस पूर्ण होतो, याचे भान प्रत्येक नागरिकाने पाळणे आवश्यक आहे.

डॉ. पी. डी. गांडाळ, आरोग्य उपसंचालक

फोटो

२६गांडाळ फोटो

Web Title: The best alternative to safety mask!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.