कर्तृत्व सिद्धीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:34 AM2018-12-14T01:34:19+5:302018-12-14T01:34:41+5:30
जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, कठीण परिश्रमांसोबत स्मार्टवर्क हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले.
नाशिक : जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, कठीण परिश्रमांसोबत स्मार्टवर्क हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले.
के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्पर्धा परीक्षेची तयारी व मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या जयंती सोहळ्यात व्यासपीठावर आयआरएस आदित्य रत्नपारखी यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, संचालक संपतराव वाघ, परशराम आव्हाड आदी उपस्थित होते. संजय दराडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने वेळेचे नियोजन व दैनंदिन अभ्यासाचे नियोजन करताना स्वत:ची वैचारिक परिपक्वताही विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोंडाजी आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना कष्ट व परिश्रम करून यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचण्याचे आवाहन केले. दरम्यान, आयआरएस आदित्य रत्नपारखी यांचा सत्कार करण्यात आले.
प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी परिचय करून दिला, तर प्रास्ताविक प्रा. शरद काकड यांनी केले. प्रा. डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपप्राचार्य प्रा. कैलास गिते यांनी आभार मानले.