‘युवा परिवर्तन’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:46+5:302021-01-22T04:13:46+5:30

सिन्नर : सोनांबे येथे युवाशक्ती पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवताना ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे ...

The bet of ‘youth change’ | ‘युवा परिवर्तन’ची बाजी

‘युवा परिवर्तन’ची बाजी

Next

सिन्नर : सोनांबे येथे युवाशक्ती पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवताना ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या नेतृत्वातील समर्थ व भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

केरू पवार यांच्याविरुध्द डॉ. रवींद्र पवार, तानाजी पवार, दामू बोडके, संजय बोडके, एकनाथ पवार, चंद्रभान पवार, सोपानकाका पवार आदींनी एकत्रित येत युवा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते. ते पवार यांना पेलता आले नाही. युवा परिवर्तन पॅनलचे जनार्दन पवार (३९३), भगवान पवार (३७८), प्रमिला पवार (४५९), समाधान बोडके (६३१), ज्योती पवार (६४६), रोहिणी डगळे (५७०), सुजाता दीपक जगताप (३६१), शरद डगळे (३२४), डॉ. रवींद्र पवार (५५०), पुष्पा पवार (५६५), आरती पवार (५७४) यांनी विजय मिळविला. विरोधी समर्थ पॅनलने वॉर्ड क्रमांक १ मध्ये एकही उमेदवार दिला नव्हता. वॉर्ड २मधून संपत बोडके, उषा वारु ंगसे, आशा डगळे, वॉर्ड क्रमांक ३ मधून अनिता पवार, गोपाळ डगळे, वॉर्ड ४ मधून संदीप पवार, पार्वतीबाई पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. वॉर्ड क्रमांक १ मध्ये भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे, दत्तू पवार, सपना सहाणे यांचाही पराभव झाला.

-----------------------

प्रतिष्ठितांना बसला पराभवाचा धक्का

युवा परिवर्तन पॅनलमधून डॉ. रवींद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही जोरदार लढत झाली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्ते रामनाथ डावरे या दोन्ही प्रतिष्ठीत व्यक्तिंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

-----------------

सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे युवा परिवर्तनने बाजी मारल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (२१ सोनांबे)

===Photopath===

210121\21nsk_7_21012021_13.jpg

===Caption===

२१ सोनांबे

Web Title: The bet of ‘youth change’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.