कोरोना प्रतिबंधक सुविधांंच्या उपलब्धतेसाठी केले शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:11 AM2021-06-05T04:11:07+5:302021-06-05T04:11:07+5:30
लोकमत न्यू नेटवर्क चांदवड : तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आटोक्यात यावे यासाठी जनजागृती करतानाच आ. डॉ. राहुल आहेर ...
लोकमत न्यू नेटवर्क
चांदवड : तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आटोक्यात यावे यासाठी जनजागृती करतानाच आ. डॉ. राहुल आहेर यांनी शासन नियमांच्या अंमलबजावणीसह गावोगावी जंतुनाशक फवारणीवर भर दिला. तसेच कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्ष सुरू करताना अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करून रुग्ण व आरोग्य यंत्रणेचा ताण हलका केला.
दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली. दुसऱ्या लाटेत डॉ. आहेर यांनी आमदार निधीतून १२ लाख ६५ हजारांचे दोन ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन तर बीपॲप मशीन घेण्यासाठी सात लाख वीस हजार रुपये दिले. पूर्वी तीस ऑक्सिजन बेड ट्रामा केअर सेंटर येथे होते. डॉ. आहेर यांनी पुन्हा पन्नास ऑक्सिजन बेडची परवानगी आणून ते चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू केले. आता सद्य:स्थितीत तेथे ८० बेडची व्यवस्था आहे. तालुक्यातील नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करून त्याठिकाणी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे चांदवड उपजिल्हा रुग्णालयास रुग्णवाहिका मिळवून दिली.
तालुक्यातील रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी तसेच शासन नियमाच्या अंमलबजावणीसाठी दर आठवड्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणी समजावून घेतल्या व त्यावर उपाययोजना केल्या.
इन्फो...
गावोगावी लसीकरणाची मागणी
चांदवड तालुक्यात अधिकाअधिक लसीकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉॅ. कपिल आहेर यांची भेट घेऊन गावोगावी लसीकरण करण्याची मागणी केली. रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना फार्मा एजन्सी व डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्याची उपलब्धता केली. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संपर्कात राहून तालुक्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर भरून घेतले. या काळात स्वत: बाधित असताना योग्य ती खबरदारी घेऊन बैठकांद्वारे नियोजन करून तालुक्याची धुरा सांभाळली.
इन्फो...
ऑक्सिजन बेड - ८०
ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर -१
मंजूर ऑक्सिजन प्लांट - १
रुग्णवाहिका -१
ड्युरा सिलिंडर - ३
ब्रॉयपॉप मशीन- ५
कोट...
कोरोना काळात ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालय नाशिक येथील सर्व ७५० बेड कोविड रुग्णांसाठी राखीव करावे व नॉन कोविड रुग्णांसाठी संदर्भ सेवा रुग्णालयात व्यवस्था करावी, अशी आग्रही भूमिका मांडली. त्याचाच परिपाक म्हणून शेवटी जिल्हा रुग्णालयात १५० अतिरिक्त बेडच्या कोविड सेंटरची मागणी करून ते सुरू केले आहे.
- डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड
===Photopath===
030621\202903nsk_60_03062021_13.jpg~030621\202903nsk_61_03062021_13.jpg
===Caption===
डॉ. राहुल आहेर~खासदार भारती पवार व आरोग्य यंत्रणेसोबत