भारत-न्यूझीलंड सामन्यावर बेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:36 AM2017-11-06T00:36:38+5:302017-11-06T00:37:00+5:30
टी-२० सामना : चौघेजण ताब्यात; थायलंडचे चलन असलेल्या नोटा जप्त नाशिकरोड : राजकोट येथे शनिवारी झालेल्या भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यावर वडनेर येथील एका बंगल्यात बेटिंग खेळणाºया अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकून चौघा जणांना अटक केली, मात्र पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी या कारवाईत दोन चारचाकी, दोन दुचाकी, २६ मोबाइल, लॅपटाप, दहा हजार रोख, थायलंडचे चलन असलेल्या आठ नोटा असा २८ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हा शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आज उपनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.
टी-२० सामना : चौघेजण ताब्यात; थायलंडचे चलन असलेल्या नोटा जप्त
नाशिकरोड : राजकोट येथे शनिवारी झालेल्या भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यावर वडनेर येथील एका बंगल्यात बेटिंग खेळणाºया अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकून चौघा जणांना अटक केली, मात्र पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी या कारवाईत दोन चारचाकी, दोन दुचाकी, २६ मोबाइल, लॅपटाप, दहा हजार रोख, थायलंडचे चलन असलेल्या आठ नोटा असा २८ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हा शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आज उपनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना वडनेर येथील बंगल्यात क्रि केट सामन्यावर बेटिंग घेतली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन, उपनिरीक्षक बलराम पालकर, महेश शिंदे, गणेश जाधव, हवालदार कोकाटे, गिते, देशमुख आदींनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास विहितगाव-वडनेर गेटजवळील साई सहवासनगरमधील एका रो-हाउसवर छापा टाकला. त्याठिकाणी जावेद शेख अल्ताफ (३०, अंजुमन शाळा, गोसावीवाडी, नाशिकरोड), बाबी ऊर्फ हरिष प्रेम थावराणी (३०, साईजन कॉलनी, सौभाग्यनगर, नाशिकरोड), इम्रान मलिक जखवाला (३०, गिरीजा अपार्टमेंट, सौभाग्यनगर, नाशिकरोड), जय अजय राव (नानावली पार्कसमोर, लॅमरोड, नाशिकरोड) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तेथून प्रेम ताराचंद थावराणी (साईजन कॉलनी, सौभाग्यनगर), समीर अ़निस थावरानी (सिंधी कॉलनी, जेलरोड), वीजेंद्र विनोद निर्मळकर (विजय टॉवर, कॅनडा कार्नर, शरणपूररोड), चेतन काशीनाथ पाटील (गाडेकर मळा, देवळालीगाव), रोहित प्रकाश विंग (शांती निवास, सावरकरनगर, जेलरोड) हे पाच जण पळून गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या छाप्यात पेजोरो गाडी, क्रुझ कार, बुलेट, होंडा डिओ, लॅपटॉप, २६ मोबाइल, टीव्ही, व्हाईस रेकार्डर, सीमकार्ड, मेमरी कार्ड, रोख दहा हजार रोख, थायलंडच्या आठ नोटा असा २८ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.