वऱ्हाडी सावधान! नियम मोडल्यास दंडाचे प्रावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 02:59 PM2021-06-08T14:59:18+5:302021-06-08T15:01:44+5:30

नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला आहे. 

Beware of brides! Provision of penalty for breaking the rules | वऱ्हाडी सावधान! नियम मोडल्यास दंडाचे प्रावधान

वऱ्हाडी सावधान! नियम मोडल्यास दंडाचे प्रावधान

Next
ठळक मुद्देआयु्क्तांचा नवा दंडक थेट चाळीस हजार रूपये दंड 

नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला आहे. 

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नोव्हेंबरपासून निर्बंध शिथील झाले आणि त्यामुळेच लग्न सोहोळे धुमधडक्यात होऊ लागले. वऱ्हाडींच्या संख्येला मर्यादा असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तेही एक कारण ठरले. त्यामुळे राज्य सरकारने ५ एप्रिल पासून निर्बंध घालून दिले असले तरी नाशिक शहरात १५ एप्रिलपासूनच लग्न सोहळ्यांंना मंगल कार्यालयात करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर आता गेल्या सोमवारपासून निर्बंध शिथील झाले असू लग्न सोहळ्यासाठी पन्नास वऱ्हाडींनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी मर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता लग्न सोहळ्यात निमयांचे उल्लंघन झाल्यास थेट दंड ठोठोवण्याचा इशारा दिला आहे.

लग्न सोहोळ्यापूर्वी मंगल कार्यालय चालक, लॉन्स चालकांनी आपल्या भागातील पोलीस ठाणे आणि महापालिकेच्या विभागीय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर वऱ्हाडींची संख्या वाढल्यास आणि आरोग्य नियमांचे पालन न झाल्यास लॉन्स अथवा मंगल कार्यालयांना प्रत्येकी वीस हजार तर वधू आणि वर पक्षालाही प्रत्येकी दहा असा एकुण चाळीस हजार रूपयांचा दंड करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांचा परवाना  पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी नमूद करण्यात आली आहे.

दुकानदारांना पाच तर ग्राहकाला एक हजाराचा दंड

आरोग्य नियमांचे आणि निर्बंधांचे पालन बंधनकारक असून अत्यावश्यक दुकाने आणि अन्य दुकाने देखील सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत खुल्य असल्या तरी आरोग्य नियमांचे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे नियमबाह्य पध्दतीने आस्थापना सुरू ठेवल्यास दुकानदारांना पाच हजार रूपये तर दुकानातील ग्राहकास एक हजार रूपये दंड करण्यात येणार आहे.

Web Title: Beware of brides! Provision of penalty for breaking the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.