बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:45 AM2018-02-17T01:45:51+5:302018-02-17T01:46:14+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि. १९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंती उत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा इंदिरानगर पोलिसांनी शिवजयंती व शांतता समितीच्या बैठकीत दिला.

 Beware if you will collect the ransom ... | बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार...

बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार...

Next

इंदिरानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि. १९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंती उत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा इंदिरानगर पोलिसांनी शिवजयंती व शांतता समितीच्या बैठकीत दिला.  इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. काही व्यक्ती जयंती, भंडारा, महाप्रसादाच्या नावाखाली व्यापाºयांकडून बळजबरीने व अट्टाहास करून अमुक रक्कमच द्या, असा दबाव निर्माण करतात. अशा परिस्थितीत ही वर्गणी नव्हे तर खंडणी वसुली ठरते. त्यामुळे कायद्याने असा प्रकार करणाºयांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे न्याहाळदे म्हणाले. तसेच उत्सव हा शांततेत व नियमात साजरा करावा.  न्यायालयाने डीजेच्या वापरास बंदी घातलेली असल्याने डीजेचा वापर कोणाकडूनही होणार नाही याची खबरदारी घ्यावी. डीजेचा वापर करणाºया मंडळाचे पदाधिकारी व डीजेचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी. मिरवणूक ही शांततेत पार पाडावी, कुठल्याही प्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच यावेळी सण-उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे मार्गदर्शन त्यांनी केले. बैठकीला परिसरातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Beware if you will collect the ransom ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.