चोवीस तासांत खुनाची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:04 PM2018-08-11T18:04:56+5:302018-08-11T18:05:13+5:30

नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार घडला. ताराचंद बुधा जाधव (४२, रा. चिंचखेड तांडा, ता. कन्नड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

 Beware of the murder in twenty-four hours | चोवीस तासांत खुनाची उकल

चोवीस तासांत खुनाची उकल

Next
ठळक मुद्देबोलठाण : अनैतिक संबंधावरून प्रकार

नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार घडला. ताराचंद बुधा जाधव (४२, रा. चिंचखेड तांडा, ता. कन्नड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
संशयित आरोपी प्रकाश शंकर वैद्य (२३, रा. ममदापूर, ता. येवला) याचे लग्न जमत नसल्याने तो मामाच्या गावी कामधंदा शोधण्यासाठी बोढरे, ता. वैजापूर येथे राहण्यास आला. मामांकडे शेळ्यांचे कळप असल्याने तो तेथेच कामधंदा करू लागला. मामा-मामीसह शेळ्या मेंढ्यांच्या कळपासोबत वस्तीवर राहू लागला. याच दरम्यान त्याचे मामीशी सूत जमले. याच दरम्यान जंगलात त्यांना शेळ्या चारताना ताराचंद बुधा जाधव याच्याशी भेट झाली. तोसुद्धा कामधंद्याच्या शोधात फिरत होता. त्याने संशयित आरोपी प्रकाश व त्याची मामी या दोघांचे अनैतिक संबंध बघितले. या अनैतिक संबंधाची त्याने मामाकडे वाच्यता करू नये म्हणून दि. ५ आॅगस्ट रोजी प्रकाश व ताराचंद हे बोलठाण येथे मद्यपानासाठी बसले. या दरम्यान दोघात अनैतिक संबंधावर बाचाबाची झाली. तेव्हा संशयिताने जवळच असलेली कुºहाड हातात घेऊन तिच्या उलट्या ताराचंदच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. ताराचंदचे प्रेत बोलठाण येथील बाजार समितीच्या बाजूला असलेल्या काटेरी कुंपणात फेकून दिले. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांत या खुनाचा छडा लावला आणि गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल भवर, हवालदार रमेश पवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title:  Beware of the murder in twenty-four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.