सतर्कता बाळगा : बनावट ई-मेलद्वारे होणारा चीनी सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:02 PM2020-06-27T17:02:40+5:302020-06-27T17:11:24+5:30

पुर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन या देशांत संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. यानंतर चीनकडून सायबर हल्ल्यांच्या हालचालीसुध्दा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा अ‍ॅलर्ट मिळाला.

Beware: thwart Chinese cyber-attack attempts by fake e-mails! | सतर्कता बाळगा : बनावट ई-मेलद्वारे होणारा चीनी सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडा !

सतर्कता बाळगा : बनावट ई-मेलद्वारे होणारा चीनी सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडा !

Next
ठळक मुद्देहा अ‍ॅटक ncov2019.gov.in या ई-मेलद्वारे होऊ शकतोअनोळखी ई-मेल वाचण्याचा प्रयत्न करू नकाकोरोनाची मोफत नमुना चाचणीच्या आमिषाला बळी पडू नका

भारतातचीनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर ईमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्क राहण्याचा इशारा नुकताच जाहीर केला गेला आहे. यामुळे नेमका चीनी सायबर हल्ला म्हणजे काय? याबाबत नाशिकमधील युवा सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्याशी साधलेला हा संवाद...


* चीनी सायबर हल्ला म्हणजे नेमके काय ?
- चीनकडून संभाव्य सायबर हल्ला शासकिय नावाने बनावट ई-मेल पाठवून चीनी हॅकर्सकडून केला जाण्याची शक्यता आहे. या ई-मेलमध्ये वेगवेगळे प्रलोभनेदेखील दाखविले जाऊ शकतात किंवा कोविडबाबतचा औषधोपचार किंवा एखाद्या ई-मेलमध्ये वैयक्तिक कागदपत्रे किंवा बॅँकेच्या डिटेल्सदेखील मागणी केलेली असू शकते. बनावट ई-मेलचा वापर करून हॅकर्स क्रिमिनलद्वारे ‘फिशिंग अ‍ॅटेक’ केला जातो. यामुळे नागरिकांनी अशा बनावट ई-मेलपासून सावध रहावे. सरकारने ई-मेलला प्रतिसाद देऊ नये, असे म्हटले आहे. तसेच अनेकदा बनावटरित्या ‘फेक कॉल्स’सुध्दा केले जाऊ शकतात.

* चीनी सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका कसा होऊ शकतो ?
- चीनी सायबल हल्ल्याचा धोका सर्वाधिक बनावट ई-मेलद्वारे भारतीयांना पोहचविला जाऊ शकतो. बनावट ई-मेलमध्ये कुठल्याहीप्रकारची प्रलोभने किंवा कोरोनासंदर्भातील औषधोपचाराची माहिती, डब्ल्यूएचओच्या नावाने काही कागदपत्रांची फोटो, बनावट व्हिडिओ आदि प्रकारे नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चिनी हॅकर्सद्वारे बनावट ई-मेल पाठवून करू शकतात.

* सायबर हल्ल्यांसारखा धोका टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी?
- नागरिकांनी सायबर सुरक्षाविषयी जागरूक राहणे गरजे आहे. त्यासाठी सोशलमिडियाचा वापर करतानासुध्दा अधिक सजगता दाखविणे महत्त्वाचे ठरते. सोशलमिडियावरून प्राप्त होणारे विविध व्हिडिओ, फोटो, आॅडिओ क्लिपबाबत पडताळणी अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सोशलमिडियाचे अकाउंट वापरताना त्याचा पासवर्ड हा एकसारखाच ठेवू नये. दर आठवड्याला फेसबुक, ट्विटर, ई-मेल आदिंचा पासवर्ड अपडेट करत रहावे. चीनी हॅकर्स एखाद्या सर्वरवर पहिल्याप्रथम हल्ला चढवून त्याद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहितीवर घाला घालण्याचा प्रयत्न करू शकतात.

* देशातील कोणती शहरे ‘फिशिंग अ‍ॅटक’द्वारे लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे?
- सायबर गुन्हेगारांकडे दोन लाखांपेक्षा अधिक भारतीय नागरिकांचे ई-मेल अ‍ॅड्रेसचा डेटा त्यांनी यापुर्वीच मिळविला असल्याचा दावाही केला आहे. याअधारे त्यांच्याकडून सायबर हल्ले करण्याची शक्यता आहे. एका बनावट ई-मेलवरून मोफत कोरोना चाचणी करून घ्यावी असे प्रलोभन दाखवून चीनी सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होऊ शकते. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद यांसारखी मोठी शहरे सर्वप्रथम या सायबर गुन्हेगारांच्या रडारवर आहेत. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून यासंदर्भात सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात नुकतेच स्टेट बॅँक आॅफ इंडियाकडूनदेखील टिवटरद्वारे नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

* भारतात कुठल्या क्षेत्रातील वेबला चिनी सायबर हल्ल्यांचा धोका आहे?
- भारतातील बॅँकीग क्षेत्र तसेच भारतीय वेब वर ४० हजार वेळा सुमारे या पाच दिवसांत प्रयत्न केला गेल्याची माहिती पुढे येत आहेत. पुर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन या देशांत संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. यानंतर चीनकडून सायबर हल्ल्यांच्या हालचालीसुध्दा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा अ‍ॅलर्ट मिळाला. याबाबत नुकतेच बॅँकांनी आपल्या ग्राहकांना सावध करण्यास सुरूवातही केली आहे.
--
शब्दांकन : अझहर शेख, नाशिक


--

 

 

Web Title: Beware: thwart Chinese cyber-attack attempts by fake e-mails!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.