भाजपाचे यश क्रियाशील बूथरचनेत सौदान सिंह : आगामी निवडणुकांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:20 AM2017-07-30T01:20:59+5:302017-07-30T01:21:07+5:30
कार्यकर्त्यांनी पक्षात काम करताना नागरिकांकडून येणाºया प्रश्नांची दखल घेऊन ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपाचे यश हे सक्रिय बूथरचनेत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टÑीय सहसंघटनमंत्री सौदान सिंह यांनी केले.
नाशिक : कार्यकर्त्यांनी पक्षात काम करताना नागरिकांकडून येणाºया प्रश्नांची दखल घेऊन ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपाचे यश हे सक्रिय बूथरचनेत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टÑीय सहसंघटनमंत्री सौदान सिंह यांनी केले. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सौदान सिंह यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांची ओळख करून घेतली. यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी खासदार प्रताप सोनवणे, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, भाजपा जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष तृप्ती धारणे, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, भाऊराव निकम, बापू पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदाबाई पारख, सुनील बच्छाव, विजय जाधव, प्रवीण अलई, माजी आमदार संजय पवार, डॉ. विलास बच्छाव, तसेच नगरसेवक, तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा पदाधिकारी यांच्यासह ५०० निमंत्रित सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सौदान सिंह यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी पक्षात काम करताना येणाºया विविध प्रश्नांची दखल घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला. तसेच जिल्ह्यातील भाजपाच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. भाजपाचे यश मंडल स्तर तसेच बूथ कमिटीनिहाय पक्ष कार्यकर्त्यांची सक्रियता यावर अवलंबून असून, कार्यकर्त्यांनी यावर अधिकाधिक भर द्यावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते. बैठकीचे सूत्रसंचालन नंदकुमार खैरनार यांनी केले.