भाभा यांनी रचला अणुऊर्जेचा पाया
By admin | Published: October 9, 2016 12:57 AM2016-10-09T00:57:28+5:302016-10-09T00:58:58+5:30
शंकरराव गोवारीकर : मविप्र व्याख्यानमालेत प्रतिपादन
नाशिक : डॉ. होमी भाभा यांनी भारतात अणुविज्ञानाचा पाया रोवला. भाभा यांनी दिलेल्या योगदानामुळे आपला देश अणुऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व सामर्थ्यशाली होऊ शकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले.
निलवसंत फाउंडेशनच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र व्याख्यानमालेत गोवारीकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. व्यासपीठावर डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डी. डी. काजळे , प्रा. रामनाथ चौधरी, एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, अपूर्वा जाखडी, लिना जाखडी उपस्थित होते.
गोवारीकर यांनी ‘डॉ. होमी भाभा यांचे भारताच्या अणुविज्ञान क्षेत्रात योगदान, भारताच्या क ामगिरीचा प्रवास’ या विषयावर बोलताना गोवारीकर म्हणाले, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये भाभा यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना भारतात करण्यात आली. भाभा यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे भारतात अणु ऊर्जा केंद्र अस्तित्वात आले. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा, असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. भाभा यांच्या विधायक कार्याच्या बळावर भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला. भाभा यांनी अणुचा संहारक उपयोग होता कामा नये, या उद्देशाने जगातील शास्त्रज्ञांना एकत्र आणून त्यासाठी विशेष प्रयत्न केले, असेही गोवारीकर यावेळी म्हणाले.