भाभानगरला महिलांसाठी रुग्णालय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:50 PM2018-10-12T23:50:12+5:302018-10-13T00:43:02+5:30

भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी आडके यांनी बाजूला ठेवल्याने त्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. तथापि, शुक्रवारी (दि.१२) शिवसेनेचा विरोध पत्करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Bhabhanagar has sanctioned the hospital for women | भाभानगरला महिलांसाठी रुग्णालय मंजूर

भाभानगरला महिलांसाठी रुग्णालय मंजूर

Next
ठळक मुद्देस्थायीचे शिक्कामोर्तब राजकीय कुरघोडीनंतर अखेर निर्णय

नाशिक : भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी आडके यांनी बाजूला ठेवल्याने त्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. तथापि, शुक्रवारी (दि.१२) शिवसेनेचा विरोध पत्करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
भाभानगर येथील या नियोजित रुग्णालयाला परिसरातील डॉ. भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुउद्दिष्ट सेवा समितीने विरोध करीत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यासंदर्भात गुरुवारी (दि. ११) सुनावणी करण्यात आली. त्यानुसार या रुग्णालयाच्या बाबतीत असलेल्या आक्षेप आणि हरकतींवर सूचना आणि हरकती घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सादर केले असून, त्यानुसार प्रशासनाने समितीला पत्र सादर केले होते. याचिकाकर्ता प्रकाश क्षीरसागर यांच्या याचिकेचे हे पत्र सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाची योग्य ती दखल प्रशासनाने घ्यावी, असे आदेशही सभापती हिमगौरी आडके यांनी दिले.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १२) पार पडली. यावेळी रुग्णालयासाठी जागा देण्याचा विषय पार पडला. आमदार देवयानी यांनी फरांदे यांनी महिलांसाठी खास शंभर खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहानजीक रुग्णालय साकारण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता; मात्र माजी आमदार आणि सध्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले वसंत गिते तसेच त्यांचे सुपुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांचे विरोध करणाऱ्यांना पाठबळ असल्याचे दिसत असल्याने हा विषय गाजत होता.
गेल्यावेळी तहकूब करण्यात आलेला हा विषय चर्चेला आल्यानंतर त्यास विरोधकांनी विरोध केला. नवे रुग्णालय करण्यापेक्षा झोपडपट्टी भागात सुविधा पुरवा अशी मागणी सुषमा पगार यांनी केली. तर रुग्णालय साकारल्यानंतर गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचे काय होणार? असा प्रश्न करीत शिवसेनेचे भगवान आरोटे, प्रवीण तिदमे यांनी त्यास विरोध केला. रुग्णालयाचे वाहनतळ आणि अन्य विषयांसंदर्भात त्यांनी अनेक प्रश्न विचारून विरोध केला. तर शहरात रोगराई असल्याने अशाप्रकारचे रुग्णालय आवश्यक असल्याचे उद्धव निमसे यांनी सांगितले, तर केवळ महिलांसाठी अशाप्रकारचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मुशीर सय्यद यांनी समर्थन दिले.
कोमल मेहरोलिया यांनीदेखील रुग्णालयाची आवश्यकता सांगतानाच नवरात्रात दुर्गेचा उत्सव सुरू असताना महिलांसाठी रुग्णालय मंजूर करून भेट द्यावी, असे आवाहन केले. दिनकर पाटील यांनीही समर्थन देताना मनपाच्या रुग्णालयांची महापौर दौºयात आढळलेल्या रुग्णालयांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान, शिवसेनेचा विरोध नोंदवून घेत सभापती हिमगौरी आडके यांनी रुग्णालयासाठी नाममात्र भाड्याने जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
नवे बिटको रुग्णालय पुढील वर्षात
महापालिकेच्या सर्वात मोठ्या बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम २००९ पासून सुरू असूनदेखील ते अद्याप पूर्ण होत नाही आणि लोकांना त्याचा उपयोग घेता येत नसल्याबद्दल दिनकर पाटील आणि संतोष साळवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आणि संथगतीने सुरू असलेले हे बांधकाम २०२५ मध्येच पूर्ण होईल का? असा प्रश्न केला. प्रभारी शहर अभियंता संजय घुगे यांनी इमारतीचे बांधकाम आणखी जास्तीत जास्त सहा महिन्यांत पूर्ण होईल असे सांगितले तर विद्युत विभागाचे अभियंता वनमाळी यांनी मार्च महिन्यापर्यंत विद्युतीकरणाची कामे पूर्ण होतील असे सांगितले आणि त्यातून वाद मिटला.
४महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस तसेच अपुरी कर्मचारी संख्या यावर बरेच प्रश्न झाल्यानंतर अखेरीस याबाबत पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आडके यांनी दिले.

Web Title: Bhabhanagar has sanctioned the hospital for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.