अभोणा शाळेत भाजीबाजार

By admin | Published: January 10, 2016 10:44 PM2016-01-10T22:44:27+5:302016-01-10T22:45:40+5:30

अभोणा शाळेत भाजीबाजार

Bhabibazar in the school of Abhuna | अभोणा शाळेत भाजीबाजार

अभोणा शाळेत भाजीबाजार

Next

अभोणा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी अभिरूप भाजीबाजार भरविला
होता. बाजाराचे उद्घाटन उपसरपंच राजेंद्र वेढणे यांच्या हस्ते व शालेय व्यवस्थापन समिती  अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष योगेश वाळुंज, केंद्रप्रमुख प्रभावती गोराणे, मुख्याध्यापक सुरेश येवला, विमलताई विसपुते, हिराबाई अहिरराव, विशाल हिरे, मनीषा बिरार, ललिता राजभोज, जितेंद्र मुठे, भावराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अभिरूप बाजार म्हणजे काय व त्यामागील उद्देश याबाबत सुरेश येवला यांनी प्रास्ताविकात सखोल माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतातील भाजीपाला शाळेत आणला होता व ते स्वत: त्याची विक्री करत होते. त्यातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा, व्यवहारज्ञान, नाणी व नोटा हाताळून प्रत्यक्ष व्यवहार करण्याचा अनुभव देण्यात आला. सदर उपक्रमाला पालक, ग्रामस्थ, शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिमा देवरे, चंद्रकला चव्हाण, उज्ज्वला इखनकर, कैलास निकुंभ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Bhabibazar in the school of Abhuna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.