सटाणा वकील संघाच्या अध्यक्षपदी भदाणे, उपाध्यक्षपदी चंद्रात्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:23+5:302021-02-24T04:16:23+5:30
सटाणा : येथील न्यायालयातील सटाणा वकील संघाने बिनविरोध निवडणुकीची परंपरा सलग विसाव्या वर्षीही यंदा कायम राखली. संघाच्या अध्यक्षपदी नाशिक ...
सटाणा : येथील न्यायालयातील सटाणा वकील संघाने बिनविरोध निवडणुकीची परंपरा सलग विसाव्या वर्षीही यंदा कायम राखली. संघाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. पंडितराव भदाणे, उपाध्यक्षपदी ॲड. नितीन चंद्रात्रे, सचिवपदी ॲड. रमेश जाधव, तर खजिनदारपदी ॲड. मनीषा ठाकूर-पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ॲड. भदाणे यांनी सलग वीस वर्षे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान मिळवला आहे.
येथील न्यायालय आवारातील सभागृहात वकील संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडीसाठी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्षपदी सर्वानुमते ॲड. भदाणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ॲड. चंद्रात्रे, सचिवपदी ॲड. रमेश जाधव, सहसचिवपदी ॲड. विश्वास सोनवणे, खजिनदारपदी ॲड. ठाकूर-पवार, सदस्यपदी ॲड. शोनकुमार देवरे, ॲड.यशवंत सोनवणे, ॲड. प्रणव भामरे महिला सदस्य ॲड. सुजाता पाठक यांचा समावेश आहे.
संघातर्फे ज्येष्ठ वकिलांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व वकील बांधव उपस्थित होते. दरम्यान, संघाची निवडणूक सलग विसाव्या वर्षी बिनविरोध पद्धतीने पार पाडल्याबद्दल न्यायाधीश विक्रम आव्हाड आणि न्यायाधीश ए.जे. तांबोळी यांनी वकील संघाचे अभिनंदन केले आहे.
इन्फो...
वीस वर्षे अध्यक्षपदाचा मान
ॲड. भदाणे यांनी सलग वीस वर्षे संघाचे अध्यक्षपद भूषविले असून, या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. वृक्षारोपण, व्याख्याने घेतली. कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त यांच्यासह समाजातील गोरगरिबांना मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सटाणा न्यायालयात दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. न्यायालयाच्या १२ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणार्या प्रस्तावित नव्या इमारतीसाठी पाठपुरावा, न्यायालय आवारात पक्षकारांसाठी 'प्रतीक्षालय' इमारतीच्या उभारण्यासाठी संघाचे विशेष योगदान आहे.
===Photopath===
230221\23nsk_23_23022021_13.jpg~230221\23nsk_24_23022021_13.jpg
===Caption===
ॲड पंडितराव भदाणे~ॲड. नितीन चंद्रात्रे