भेंडी-पिंपळे ३३ केव्ही लाईनला भादवण गावाचा तिव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:18 PM2020-08-09T16:18:00+5:302020-08-09T16:19:29+5:30
पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
कळवण तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून या कामात संबधीत ठेकेदाराने व अधिकारींनी संगनमत करून ग्रामस्थांना विश्वासात न घेता दमदाटी करून काम बिनधास्तपणे सुरु ठेवले आहे. भेंडी ते पिंपळे दरम्यान भेंडी, बेज, गांगवण, भादवण, पिळकोस, ककाणे, खेडगांव, धनेर, गणोरे, मोकभणगी, दहयाने, चिंचपाडा मार्गे पिंपळे येथे नविन सबस्टेशनसाठी ३३ केव्हीची लाईन गेली असुन यात कोणत्याही ग्रामपंचायतींची रीतसर परवानगी कींवा ठराव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अथवा ठेकेदाराने घेतला नाही. या कामासंदर्भात कार्यकारी अभियंता रु पेद्र टेंभुर्णे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संबधीत ठेकेदाराने मंत्रालयातून ३३ केव्हीचे काम मंजूर करून आणले आहे. यात आम्ही काही करू शकत नाही. जरी संबधीत ठेकेदाराने मंत्रालयातून काम मंजूर करून आणले असेल. पण काम बेकायदेशीरपणे करण्यास मंत्रालयाने परवानगी दिली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. भादवण गावासह ईतर कोणत्याही गावांची या कामाची परवानगी किंवा ठराव संबधीतांने घेतला नसल्याची माहीती स्थानिक ग्रामसेंवकांनी दिली आहे. या कामाला परीसरातून विरोध असून हे काम तात्काळ बंद करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इषारा भादवणचे अभिमान चव्हाण, रामदास जाधव, बाळासाहेब जाधव, दिलीप जाधव, रमेश जाधव, हिरामण जाधव, शरद जाधव, बाबाजी जाधव, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर खैरनार, एकनाथ जाधव व ग्रामस्था तसेच शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रतिक्र ीया ...
भेंडी ते पिंपळे दरम्यान गेलेल्या ३३ केव्ही लाईनला आमचा तिव्र विरोध असून, भादवण ग्रामपंचायतीची संबधीत अधिकारी व ठेकेदाराने ठराव घेतलेला नाही. ही लाईन भादवण गावातून गेल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे . यात काही जिवीतहानी झाल्यास त्यला म वीज वितरण कंपनी जबाबदार राहील.
- रामदास जाधव, ग्रामस्थ, भादवण.