येवला पंचायत समिती उपसभापतिपदी भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:50 PM2020-08-29T23:50:52+5:302020-08-30T01:20:00+5:30

येवला : पंचायत समिती उपसभापतिपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

Bhagat as the Deputy Chairman of Yeola Panchayat Samiti | येवला पंचायत समिती उपसभापतिपदी भगत

नवनिर्वाचित उपसभापती अ‍ॅड. मंगेश भगत यांचा सत्कार करताना संभाजी पवार. समवेत आमदार किशोर दराडे, अ‍ॅॅड. माणिकराव शिंदे, प्रवीण गायकवाड, रतन बोरणारे, देवचंद गायकवाड, अरुण काळे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

येवला : पंचायत समिती उपसभापतिपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
विशेष सभेत शिवसेनेच्या वतीने अ‍ॅॅड. मंगेश भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी घोषित केले. सभेस सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, लक्ष्मीबाई गरुड, नम्रता जगताप, अनिता काळे, मोहन शेलार, सुनीताबाई मेंगाने, कविता आठशेरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
सभागृहात नवनिर्वाचित उपसभापती अ‍ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर दराडे, माजी सभापती संभाजी पवार, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, देवचंद गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, अरुण काळे, शरद लहरे, कांतिलाल साळवे, सुनील पैठणकर, अशोक मेंगाने, बी. एन. सोनवणे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले. मोहन शेलार यांनी आभार मानले.

Web Title: Bhagat as the Deputy Chairman of Yeola Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.