भगवद्गीतेमध्ये जीवनाचे कर्मयोग, भक्तियोग तत्त्वज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:25 AM2018-12-25T00:25:23+5:302018-12-25T00:25:39+5:30

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले.

 In the Bhagavad Gita, life's Karma yoga, Bhaktiyog philosophy | भगवद्गीतेमध्ये जीवनाचे कर्मयोग, भक्तियोग तत्त्वज्ञान

भगवद्गीतेमध्ये जीवनाचे कर्मयोग, भक्तियोग तत्त्वज्ञान

Next

देवळाली कॅम्प : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले.  देवळाली कॅम्प येथील धुर्जड मळा परिसरात श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन आणि गीता जयंती रौप्यमहोत्सव सोहळ्याप्रसंगी आयोजित धर्मसभेत महंत बिडकर बाबा बोलत होते.  यावेळी आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा, आचार्य महंत अंकुलनेरकर बाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत चिरडे बाबा यांनीही विचार मांडले. सकाळी देवपूजा, गीतापाठ, ध्वजारोहन, सभामंडप उद्घाटन, विडा समर्पण आदी धार्मिक विधी संपन्न झाले. प्रास्ताविक राजू बाबा यांनी केले. कार्यक्रमास उद्योजक नवीनभाई जोशी, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, लक्ष्मण जायभावे, सदाशिव धुर्जड, सोमनाथ खताळे, जगदीश गोडसे, सुरेश भोजने आदींसह संत-महंत व भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन साहेबराव महानुभाव यांनी केले.

Web Title:  In the Bhagavad Gita, life's Karma yoga, Bhaktiyog philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.